बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

0
2

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेची पुरवणी परीक्षा 7 मे ते 17 मे दरम्यान घेतली जाणार आहे. व्यावसायिक शाखेची परीक्षा 7 ते 13 मे या काळात घेतली जाणार आहे. शिक्षण मंडळाने बारावीची पुरवणी परीक्षा एप्रिलमध्ये घेण्याचे जाहीर केले होते. तथापि, राष्ट्रीय पातळावरील वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या पार्श्वभूमीवर बारावीची पुरवणी परीक्षा मेमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही पुरवणी परीक्षा खोर्ली-म्हापसा येथील पुरुषोत्तम वालावलकर उच्च माध्यमिक विद्यालय आणि बोर्डा मडगाव येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय अशा दोन केंद्रावर घेतली जाणार आहे. ही पुरवणी परीक्षा सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रांतून घेतली जाणार आहे. सकाळच्या सत्रात 9.30 वाजता आणि दुपारच्या सत्रात 2.30 वाजता परीक्षेला सुरुवात होणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा 19 मेपासून घेतली जाणार आहे.