Home Featured बारावीची फेब्रुवारीत तर दहावीची मार्चमध्ये परीक्षा

बारावीची फेब्रुवारीत तर दहावीची मार्चमध्ये परीक्षा

0

शिक्षण मंडळाकडून संभाव्य वेळापत्रक जाहीर

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील दहावी व बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावीची परीक्षा फेब्रुवारी 2026 आणि दहावीची परीक्षा मार्च 2026 या महिन्यात घेतली जाणार आहे.

शिक्षण मंडळाच्या वार्षिक नियोजनाअंतर्गत हे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून त्यात बदल होऊ शकतो, असे मंडळाने परिपत्रकात स्पष्ट केले आहे.
बारावी परीक्षा (कला, वाणिज्य व विज्ञान) 10 फेब्रुवारी 2026 ते 27 फेब्रुवारी 2026 दरम्यान घेतली जाणार आहे. बारावी व्यावसायिक शाखेची परीक्षा 11 फेब्रुवारी 2026 ते 23 फेब्रुवारी 2026 दरम्यान घेतली जाणार आहे.
दहावीची परीक्षा 2 मार्च 2026 ते 27 मार्च 2026 दरम्यान घेतली जाणार आहे. यात तांत्रिक विषयांचाही समावेश आहे. दहावी व बारावीची परीक्षा सकाळी 9.30 ते 12.30 या वेळेत घेतली जाणार आहे.
संभाव्य वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा 2 मार्च 2026 – इंग्लिश/कार्यात्मक इंग्लिश, 4 मार्च – हिंदी/कार्यात्मक हिंदी, 6 मार्च – मराठी/कार्यात्मक मराठी, 9 मार्च – समाजिक विज्ञान, 11 मार्च – गणित 2, 12 मार्च – गणित 1, 13 मार्च – भूगोल आणि अर्थशास्त्र, 14 मार्च – विज्ञान. तसेच, 27 मार्चपर्यंत एनएसक्यूएफ तसेच तांत्रिक विषयांची परीक्षा घेतली जाणार आहे.

बारावी परीक्षा (कला, वाणिज्य, विज्ञान शाखा) : 10 फेब्रुवारी 2026 – इंग्लिश, 12 फेब्रुवारी – भौतिकशास्त्र/अकाऊंट्स/ इतिहास, 14 फेब्रुवारी – जीवशास्त्र/जीओलॉजी/अर्थशास्त्र, 17 फेब्रुवारी – गणित/समाजशास्त्र, 18 फेब्रुवारी – इंग्लिश /कोकणी /उर्दु /संस्कृत/फ्रेंच/पोर्तुगीज, 19 फेब्रुवारी – मराठी, 20 फेब्रुवारी – रसायनशास्त्र/बिजनेस स्टडीज/राज्यशास्त्र, 21 फेब्रुवारी – हिंदी अशी घेतली जाणार आहे.