बायणा-पणजी कॅटमरान फेरीसेवेला प्रारंभ

0
158

दृष्टी कंपनीच्या वास्को बायणा ते पणजी या फेरीबोट सेवेला सुरूवात करण्यात आली आहे. या फेरीसेवेसाठी ८५० रूपये रूपये शुल्क आकारले जात असल्याने अनेकांनी सेवेचा वापर करणे टाळले आहे.

या सेवेसाठी ४० सीटर लक्झरी कॅटमरानचा वापर करण्यात येत आहे. या फेरीसेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद लाभू शकला नाही. त्यामुळे फेरीबोट सेवेसाठी जादा प्रवाशांची क्षमता असलेली बोट उपलब्ध करून तिकीट दर कमी करण्याबाबत व्यवस्थापनाने विचार चालविला आहे. ही फेरीसेवा शुल्काच्या बाबतीत व्यवहार्य बनविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. दृष्टीने फेरीबोट सेवेसाठी बायणा समुद्रकिनार्‍यावर खास फेरी टर्मिनल आणि फ्लोटींग जेटी उभारली आहे. वेरे पणजी येथे डेल्टीनच्या जेटीचा वापर केला जातो. तर पणजी येथे कॅप्टन ऑफ पोर्टच्या जेटीचा वापर केला जात आहे, असे सूत्रांनी सांगितले.