बाणावलीतील समुद्रात बोर्डातील तरुण बुडाला

0
105

बाणावली येथे अरबी समुद्रात सकाळी पोहायला गेलेला मनीष मनोहर शंके (३३) हा बोर्डा मडगाव येथील तरुण बुडून मृत्यू पावला. मनीष व त्याचा एक मित्र काल सकाळी ६ वा. गाडी घेवून बाणावली येथे गेले होते. तेथे गेल्यावर मनीष याने पोहायला जाऊया असे आपल्या मित्राला सांगितले. पण मित्राने नकार दिला. त्यानंतर मनीष एकटाच पोहायला गेला व मित्र गाडीतच बसून राहिला. काही वेळाने मित्राला झोप लागली. मात्र त्यावेळी समुद्रात पोहायला गेलेला मनीष गंटागळ्या खात बुडाला. तात्काळ जीवरक्षकांनी त्याला पाण्यातून बाहेर काढून इस्पितळात नेले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.