बाणस्तारी अपघात; अहवाल दोन महिन्यांत सादर करा

0
8

>> उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा आदेश

बाणस्तारी येथील पुलावर झालेल्या भीषण अपघातातील मृतांच्या तसेच जखमींच्या कुटुंबीयांनी जे नुकसानभरपाईचे दावे केले आहेत त्यासंबंधीची सुनावणी येत्या सहा महिन्यांत पूर्ण करावी, असा आदेश काल उच्च न्यायालयाने वाहन अपघातात दावा लवादाला दिला आहे. तसेच वाहन अपघात दावा लवादाला दिला आहे. तसेच वाहन अपघात दावा लवादाला हे दावे हातावेगळे करता यावेत यासाठी या अपघाताचा सविस्तर अहवाल 60 दिवसांत पूर्ण करून तो सादर करण्यात यावा असा आदेश न्यायालयाने हे तपासकाम करीत असलेल्या गुन्हा अन्वेषण पोलिसातील चौकशी अधिकाऱ्याला दिला आहे.

अपघातास कारणीभूत ठरलेल्या मर्सिडीजची मालक मेघना सावर्डेकर हिने मंगळवारी न्यायालयात 2 कोटी रुपयांची रक्कम जमा केली होती. त्यानंतर या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सुरेश आणि भावना फडते आणि अरुप करमाकर यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाख रुपये, जखमी शंकर हळर्णकर यांना 40 लाख, वनिता भंडारींना 35 लाख व राज माजगावकर यांना 25 लाख रुपये देण्याचे आदेश बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिले. दि. 6 ऑगस्ट रोजी बाणस्तारी पुलावर हा अपघात झाला होता. या अपघातात सुरेश फडते व भावना फडते हे दाम्पत्य व अरुप करमारकर यांचा जागीच मृत्यू झाला होता.