बाणस्तारी अपघाताचा तपास अखेर गुन्हा अन्वेषणकडे

0
14

बाणस्तारी पुलावर झालेल्या भीषण अपघाताचे तपासकाम काल सरकारने गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांकडे सोपवले.

या अपघातास जबाबदार असलेला मर्सिडीज कारचालक परेश सिनाय सावर्डेकर हा एक वजनदार व्यक्ती असल्याने म्हार्दोळ पोलीस स्थानकातील पोलीस त्याच्या दबावाला बळी पडून तपासकाम योग्य प्रकारे करीत नसल्याचा आरोप कुंभारजुवे मतदारसंघाचे आमदार राजेश फळदेसाई, स्थानिक लोक आणि अपघातात ठार झालेल्या मृतांच्या नातेवाईकांनी केला होता.

या पार्श्वभूमीवर आमदार राजेश फळदेसाई यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक लोकांनी व मृतांच्या नातेवाईकांनी हे प्रकरण तपासकामासाठी गुन्हा अन्वेषण पोलिसांकडे सोपवावे, अशी मागणी केली होती. त्यासाठी एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली होती.त्यांच्या वाढत्या दबावामुळे काल राज्य सरकारने या भीषण अपघाताचे तपासकाम गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांकडे सुपूर्द केले.