बांगलादेशमध्ये हिंसाचारात 91 जणांचा मृत्यू

0
8

पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी

बांगलादेशात काल रविवारी पुन्हा एकदा हिंसाचार उसळला. यावेळी आंदोलक पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत रस्त्यावर उतरले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये अनेक ठिकाणी हिंसक चकमक झाली. यात आतापर्यंत 91 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 14 पोलिसांचाही समावेश आहे. तसेच सुमारे 200 लोक जखमी झाले आहेत. हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने देशभर संचारबंदी लागू केली असून पुढील 3 दिवस सुट्टी जाहीर केली आहे. याशिवाय राजधानी ढाकामधील दुकाने आणि बँका बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या आणि स्मोक ग्रेनेडचा वापर केला. हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने इंटरनेट बंद केले आहे. याशिवाय फेसबुक, व्हॉट्सप, इंस्टाग्राम आणि एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही बंदी घालण्यात आली आहे. पंतप्रधान हसीना यांनी पोलिसांना आंदोलकांशी कठोरपणे वागण्याचे निर्देश दिले आहेत.
बांगलादेश सरकारने 2018 मध्ये विविध श्रेणींसाठी 56% आरक्षण रद्द केले होते, परंतु यावर्षी 5 जून रोजी तेथील उच्च न्यायालयाने आरक्षण पुन्हा लागू केले. मात्र, 21 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयात बदल करत आरक्षणाची मर्यादा 7 टक्क्यांवर आणली. यावरून हिंसाचार सुरू झाला असून 10 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना अटक केल आहे.

भारतीय उच्चायुक्तालयाचा इशारा

भारतीय उच्चायुक्तालयाच्या वतीने बांगलादेशात राहणाऱ्या भारतीय आणि विद्यार्थ्यांसाठीसोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना सावधगिरी बाळगण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, उच्च आयोगाने आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक +88-01313076402 बनवला आहे.