बनावट नोटांप्रकरणी गोवा पोलीस पंजाबला

0
97

पणजी पोलिसांचे एक पथक बनावट नोटा प्रकरणाच्या तपासासाठी पंजाबला रवाना झाले आहे.
पणजी पोलिसांनी बनावट नोटा प्रकरणी पंजाबमधील पाच जणांना अटक करून आठ दिवसांची पोलीस कोठडी घेतली आहे. राजदीप सिंग, गगनदीप सिंग, हरजित सिंग, राहुल लुत्रा आणि अनुराग कमार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पणजी पोलिसांनी कळंगुट येथे छापा घालून पंजाबमधील पर्यटकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून साधारण तीन लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. त्यात ५०० रुपये, २०० रुपये आणि १०० रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. पंजाबमधून आलेल्या या पर्यटकांनी पणजी आणि पर्वरी भागात बनावट नोटा चलनात आणल्याचे आढळून आले आहे. या बनावट नोटा प्रकरणाची सविस्तर चौकशीसाठी पणजी पोलिसांचे एक पथक पंजाबला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.