संजीवनी साखर कारखाना सुरू करा ः ढवळीकर

0
296

गोवा सरकारने १०० कोटी रु. खर्च करून बंद पडलेला संजीवनी साखर कारखाना येऊ घातलेल्या गळीत हंगामात सुरू करावा. त्यासाठी ६० कोटी रु. एवढा निधी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून मिळवावा. तसेच उर्वरित रक्कम गोवा सरकारने खर्च करावी, अशी सूचनावजा मागणी मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली आहे.

संजीवनी कारखाना हा गोव्यातील पहिला प्रकल्प असून तो राज्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांनी सुरू केला होता. राज्यातील ४ हजार शेतकर्‍यांची कुटुंबे या कारखान्यावर अवलंबून असून त्यांचा विचार करुन सरकारने हा कारखाना सुरू करावा, असे ढवळीकर यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कृषिमंत्री बाबू कवळेकर व भाजपचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी हा कारखाना आजही बंद करणार नाहीत, असे वचन दिले होते, असे सांगून दिलेले वचन या लोकानी पाळावे, अशी मागणी ढवळीकर यांनी काल पत्रकारांना पाठवलेल्या एका व्हिडिओद्वारे केली आहे.