बनावट तक्रारी, प्रकरणांची पर्वा नाही ः नार्वेकर

0
162

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गोवा क्रिकेट असोसिएशन (जीसीए) मधील कथित आर्थिक घोटाळ्यासंदर्भात केलेल्या कारवाईबाबात जीसीएचे तत्कालीन अध्यक्ष दयानंद नार्वेकर यांनी अशी बनावट प्रकरणे तथा तक्रारींची आपल्याला पर्वा नाही असे निवेदन एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. २६ मार्च २०१८ पर्यंत आपल्याला या कारवाईविषयी कोणताही आदेश मिळालेला नव्हता असे त्यांनी म्हटले आहे.

याप्रकरणी जे पहिले एफआयआर २ जून २०१६ रोजी नोंद झाले ते अन्य तीन आरोपींवर होते (ज्यात ३.१३ कोटी रुपये घोटाळ्याचा आरोप आहे) व आपल्याला कोणाच्या तरी आदेशावरून आरोपी क्र. ४ बनविण्यात आले. दुसरे एफआयआर २० डिसेंबर २०१६ रोजी नोंदविले गेले ते आपल्यासह अन्य सर्व पदाधिकार्‍यांवर होते, असे ते म्हणाले.