फोंड्यात आज होणार ‘एनडीए’ची प्रचारसभा

0
24

>> मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील चार मंत्री राहणार उपस्थित

>> एनडीएचे नेते सुदिन ढवळीकर, रेजिनाल्डही राहणार हजर

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ची फोंडा येथे आज (गुरुवार, दि. 2) संध्याकाळी 6 वाजता जाहीर प्रचारसभा होणार आहे. दक्षिण गोव्याच्या भाजप उमेदवार पल्लवी धेपों यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी काल फोंड्यातील पत्रकार परिषदेत दिली.

या सभेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, मगोचे नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर, कृषीमंत्री रवी नाईक, कला-संस्कृती मंत्री गोविंद गावडे, सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स व एनडीएचे अन्य नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती नरेंद्र सावईकर यांनी दिली. या पत्रकार परिषदेला माजी खासदार विनय तेंडुलकर, नगराध्यक्ष रितेश नाईक व भाजप मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ दळवी उपस्थित होते.

दक्षिण गोव्यातील भाजप उमेदवार पल्लवी धेपो यांनी प्रचाराची दुसरी फेरी पूर्ण केली आहे. सर्व मतदारसंघात भाजप उमेदवाराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. फोंडा तालुक्यातील 3 मतदारसंघातून प्रत्येकी 8 हजार मतांची आघाडी अपेक्षित आहे, असे सावईकर यांनी सांगितले.
पल्लवी धेपो यांना सावर्डे मतदारसंघातून मोठी आघाडी अपेक्षित आहे. सर्व मतभेद विसरून कार्यकर्ते प्रचारात व्यस्त झाले आहेत. यावेळी सावर्डे मतदारसंघात सर्वात जास्त आघाडी भाजपला मिळणार असल्याचे माजी खासदार विनय तेंडुलकर यांनी सांगितले.