फोंडा नगरपालिकेचे अध्यक्ष रितेश नाईक यांच्याविरुद्ध मांडलेला अविश्वास ठराव काल बारगळला. पालिकेच्या १५ नगरसेवकांपैकी ८ नगरसेवकांनी गेल्या २४ नोहेंबर रोजी नगराध्यक्ष रितेश नाईक यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मांडला होता. काल हा ठराव चर्चेसाठी आला असता, हा ठराव मांडणारे सर्व १५ नगरसेवक गैरहजर राहिल्याने हा अविश्वास ठराव बारगळला. तशी घोषणाही बैठक हाताळणारे फोंड्याचे उपजिल्हाधिकारी सीताराम सावळ यांनी केली. विशेष म्हणजे नगराध्यक्ष रितेश नाईक यांचे वडील व राज्याचे कृषीमंत्री रवी नाईक हे यावेळी उपस्थित होते.