फेंगल चक्रीवादळाचा चार राज्यांत प्रभाव

0
5

>> अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, जोरदार वारे

बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेल्या फेंगल वादळाच्या प्रभावामुळे केरळ, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्रमध्ये सोमवारी मुसळधार पाऊस पडत आहे.
फेंगल चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी पावसाचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची पत्रे उडून गेली. भारतीय लष्कराने पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. घरांमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सैन्याने ही मोहीम राबवली.

फेंगल चक्रीवादळामुळे उत्तर तमिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. जो आज सकाळपासून सुरू आहे. फेंगल चक्रीवादळ शनिवारी पुद्दुचेरीच्या किनाऱ्याजवळ पोहोचले. चक्रीवादळामुळे जोरदार पाऊस सुरू होता. वारे वाहत होते त्यामुळे चेन्नई विमानतळ बंद करावे लागले होते. पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं होतं. चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन आज पहाटे 4.00 वाजल्यापासून विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

तामिळनाडूत भूस्खलन
तामिळनाडूतील तिरुवन्नमलाई येथे एका टेकडीवर भूस्खलन झाले. सुमारे 40 टन वजनाचा खडक डोंगरावरून खाली कोसळला आणि रस्त्यावरील घरांवर पडला, ज्यामुळे 2 घरे जमीनदोस्त झाली. या मातीच्या ढिगाऱ्याखाली 7 जण अडकल्याची भीती आहे. एनडीआरएफ हायड्रोलिक लिफ्टने खडक हटवण्याचा प्रयत्न करत आहे. अन्नमलाई परिसरात भूस्खलनाची शक्यता असून येथून 50 ते 80 लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.

तामिळनाडूच्या कृष्णागिरी जिल्ह्यातील उथंगराई बसस्थानकात रस्त्यावर उभी केलेली वाहने वाहून गेल्याची घटना घडली आहे. , जी वानियांबडी रोडवर आहे.
तामिळनाडूच्या कृष्णागिरी जिल्ह्यातील उथंगराई बसस्थानकात रस्त्यावर उभी केलेली वाहने वाहून गेली, जी वानियांबडी रोडवर आहे. तामिळनाडूत मुसळधार पावसामुळे अनेक साळांना सुट्टी जाहीर केली आहे.

केरळमध्ये मुसळधार
केरळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. गेल्या 24 तासांत तामिळनाडूतील धर्मापुरी येथे 162 मिमी, सेलममध्ये 60 मिमी आणि तिरुपत्तूरमध्ये 73 मिमी पावसाची नोंद झाली आहे. केरळमध्ये 4 डिसेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

चेन्नईत तिघांचा मृत्यू
चक्रीवादळ फेंगलमुळे चेन्नईमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज पडून तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले होते. तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये कोणतेही मोठे नुकसान झाल्याची माहिती नाही. भारतीय सैन्याने पूरग्रस्त भागात लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.
फेंगल चक्रीवादळ पश्चिम-नैऋत्य दिशेकडे सरकण्याचा अंदाज असून पुढील काही तासांत ते हळूहळू कमकुवत होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.