म्हादईच्या मुद्यावरून सध्या गोव्यात गहजब माजला आहे. हाच मुद्दा काल तृणमूल कॉंग्रेसचे राज्यसभा खासदार लुईझिन फालेरो यांनी उपस्थित केला. म्हादई ही गोव्याची जीवनदायिनी असून, म्हादई नदीचे ६० टक्के प्रवाह गोव्यात आहे. ती पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील अशा पश्चिम घाटात असल्याचे फालेरो यांनी यावेळी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. कर्नाटकने या प्रकल्पासंबंधीचा जो डीपीआर सादर केलेला आहे, तो पूर्णपणे बेकायदेशीर असा असून, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणारा असल्याचे फालेरो यांनी यावेळी सांगितले.