फार्मा कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना आणखी सहा महिने एस्मा लागू

0
2

राज्य सरकारने गोव्यातील औषध निर्मिती (फार्मा) कंपन्यांतील कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेल्या अत्यावश्यक सेवा देखभाल कायद्याची (एस्मा) मुदत आणखी सहा महिन्यांसाठी वाढविली आहे.
राज्य सरकारने गेल्या 20 जूनपासून औषध निर्मिती कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संप करण्यास बंदीसाठी एस्मा लागू केला आहे. त्यामुळे औषध निर्मिती कंपन्यांतत उत्पादन, पॅकेजिंग, वितरण, वाहतूक आदी सेवांशी संबंधित असलेल्या कर्मचाऱ्यांना या काळात संप करता येणार नाही.

गृह खात्याचे अवर सचिव विवेक नाईक यांनी बुधवारी या संदर्भातील नव्याने आदेश जारी केला. औषध निर्मिती कंपन्यांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून संप होण्याची शक्यता असल्यामुळेच सरकारने कर्मचाऱ्यांसाठी एस्मा लागू केला आहे. या कर्मचाऱ्यांनी संप केल्यास त्याचा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळेच सरकारने या कर्मचाऱ्यांसाठी एस्मा लागू केला आहे.

दरम्यान, राज्यातील कामगार संघटनाकडून एस्माला विरोध केला जात आहे. औषधांची निर्मिती करून नागरिकांचे जीव वाचवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अनेक महत्त्वाच्या मागण्या व्यवस्थापनांकडून पूर्ण होत नाहीत. आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी औषध निर्मिती कंपन्यांमधील कर्मचारी संप करण्याच्या पवित्र्यात
आहेत.