फसवणूक प्रकरणी व्यावसायिक अटकेत

0
2

उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशानंतर भूमहसूल कायद्यांतर्गत फसवणूक प्रकरणात एक बांधकाम व्यावसायिक व्यंकटेश प्रभू मोनी याला पणजी पोलिसांनी अटक करून त्याची कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी काल केली. एका निवासी प्रकल्पासंबंधी सदनिका विकत घेतलेल्यांची फसवणूक केल्याने बांधकाम व्यावसायिक व्यंकटेश मोनी याच्याविरोधात गुन्हा नोंद केला होता. बांधकाम नियमन प्राधिकरणाने त्याला दोषी ठरवून 7 कोटी रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. या भरपाईची वसुली महसूल कायद्यांतर्गत करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार थकबाकी भरण्यास व्यंकटेश प्रभू मोनी अपयशी ठरल्याने अखेर उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी केला. पणजी पोलिसांनी अटक वॉरंटनुसार कार्यवाही केली. मोनी याच्यावर कारवाईसाठी फसवणूक झालेल्या नागरिकांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काही दिवसांपूर्वी निदर्शने केली होती.