कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री, आमदार प्रतापसिंह राणे यांनी भाजपचे निवडणूक प्रमुख देवेंद्र फडणवीस यांनी फोंडा येथील भाजपच्या सभेत बोलताना केलेला दावा फेटाळून लावला आहे.
आपण राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असून कॉंग्रेस पक्ष सोडणार नाही, असे कॉंग्रेस पक्षाने जारी केलेल्या ऑडिओ टेपमध्ये आमदार प्रतापसिंह राणे यांनी म्हटले आहे. भाजपचे नेते फडणवीस यांनी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांचा भाजपला आशीर्वाद लाभेल.
कॉंग्रेस पक्ष दोन आमदारांसह सायकल पक्ष बनेल, असा दावा केल्यानंतर राजकीय पातळीवर ज्येष्ठ नेते यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चेला सुरुवात झाली.
आपण गेली ४५ वर्षे कॉंग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत असून कॉंग्रेस पक्ष सोडण्याचा कोणताही विचार नाही, असेही राणे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कॉंग्रेस पक्षाने भाजपचे नेते फडणवीस यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.