>>शिक्षण संचालक गजानन भट
गोव्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांत प्रवेश घेण्यास इच्छुक असूनही वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांनी आपली नावे, पत्ता कुठल्या इयत्तेत प्रवेश हवा, मोबाईल नंबर आदी तपशीलासह आपल्या तालुक्यातील विभागीय शिक्षण कार्यालयात संपर्क साधावा, असे शिक्षण खात्याने कळवले आहे.राज्यातील बर्याच विद्यार्थ्यांना प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश मिळू शकलेला नाही अशा तक्रारी असून या पार्श्वभूमीवर शिक्षण खात्याने वरील पाऊल उचलले आहे, असे शिक्षण संचालक गजानन भट यांनी काल सांगितले.
संबंधीतांनी केंद्रीय शिक्षण कार्यालय, उत्तर गोवा शिक्षण कार्यालय व दक्षिण गोवा शिक्षण कार्यालय येथे नावे द्यावीत, असे आवाहन भट यांनी केले आहे.