- गौरी भालचंद्र
कामाचा ढीग बघून कधी घाबरून जायचे नाही माणसाने … मनुष्याचा जन्मच कर्म करण्यासाठी झालेला आहे हे लक्षात असणे आवश्यक आहे… त्यामुळे उत्साहाने कामाला लागले तरच कामे भराभर पूर्ण होऊ शकतात.
मला वाटतं … प्रयत्न म्हणजे परिश्रम नसून यशाच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल आहे … प्रयत्न म्हणजे आपल्या कृतीत सातत्य राखणे … आपल्या ध्येयांच्या रस्त्यावर चालताना नवी उमेद देणारे एक साधन… ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’.. अशी म्हण आहे खरी पण मला वाटतं आपण उत्साहाने… मनाला उमेद देत प्रयत्न केला की त्या रस्त्यावरून चालताना बळ येतं आपल्या मनाला… आणि आपण अजून ताजेतवाने होत प्रयत्न वाढवतो …. आणि चुटकीसरशी यश मिळतं बर्याचदा …
जेव्हा तुम्ही एखादे नवीन काम सुरू करता तेव्हा अनेकवेळा अपयश पदरी पडते. त्या अपयशामुळे तुम्ही काम करण्याचा प्रयत्न बंद करता. याउलट काही लोक यश प्राप्त होत नाही तोपर्यंत प्रयत्न करतात. अपयशाला घाबरू नये उलट त्यामधून यशस्वी होण्यासाठी आपण आणखी काय करावे याचा बोध घ्यावा. स्वतःवर पूर्ण विश्वास असणे गरजेचे आहे …
कामाचा ढीग बघून कधी घाबरून जायचे नाही माणसाने … मनुष्याचा जन्मच कर्म करण्यासाठी झालेला आहे हे लक्षात असणे आवश्यक आहे… त्यामुळे उत्साहाने कामाला लागले तरच कामे भराभर पूर्ण होऊ शकतात… मध्येमध्ये वाटते आपल्याला… दमल्यासारखे पण तरीही पुन्हा नवा हुरूप पांघरण्याची गरज असते…. तरच आपण नव्याने ती सुरुवात थांबलेल्या ठिकाणावरून करू शकतो…
जिंकण्याची इच्छा सगळ्यांना असते पण जिंकण्यासाठी जी तयारी करावी लागते ते करण्याची इच्छा मात्र फार थोड्या लोकांमध्ये असते… आपले लक्ष्य काय आहे जाणून घेऊन त्या दिशेने प्रयत्न करणे महत्त्वाचे असते … आपल्या मनाचे लक्ष वेधण्यासाठी खूप गोष्टी आपल्या समोर येत असतात .. पण त्याकडे लक्ष न देता पूर्ण एकाग्रतेने आपण तग धरून प्रयत्न केला पाहिजे
परिश्रमाला परिश्रम न समजता एक यशाची पायवाट समजले तर त्यावरून चालणे सोपे होऊ शकते… सर्वकाही आपल्या मानण्यावर अवलंबून असते… मुंगीसारखा लहान जीवसुद्धा प्रयत्न करताना मागे- पुढे पाहात नाही… कंटाळत नाही… मोठ्या हिमतीने पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहतो… जोवर यश हातात येत नाही तोवर
पण प्रयत्न करताना तो आनंदपूर्वक केला तर जास्त सुसह्य होतो… त्यामध्ये सहजपणा आपल्या आपण येतो. उत्कंठा ठेऊन आपण प्रयत्नांची पायवाट चालली पाहिजे तर ते करताना सुरेख वाटतं. प्रसन्नतापूर्वक केलेले यत्न फार सुखद असे असतात… निरंतर प्रयत्नशील राहण्याने आपला हेतू नक्कीच तडीस जाऊ शकतो. सफलता त्यालाच मिळत असते जो निरंतर प्रयास करत राहतो. आपल्या उद्देशाकडे पोचण्यासाठी लाटांसारखे सतत कार्यतत्पर राहावे लागते माणसाला!!