प्रमुख महामार्गांची लवकरच दुरुस्ती

0
39

राज्यातील काही प्रमुख महामार्गांची लवकरच दुरुस्ती करण्यात येणार असून, खड्डे पडलेल्या महामार्गांवर डांबर न घालता सिमेंट-कॉंक्रिट घालून त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर यांनी काल दिली. त्यासाठी या रस्त्यांवर असलेला डांबर उखडून काढला जाणार असून, त्यानंतर या महामार्गांचे कॉंक्रिटीकरण करण्यात येणार असल्याचे पाऊसकर यांनी स्पष्ट केले.

राज्यातील सर्व महामार्गांची दुरुस्ती येत्या डिसेंबर महिन्यांपर्यंत करण्यात येणार असून, रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम मंगळवारपासून हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अटल सेतू ते गोवा वेल्हा या महामार्गावर सध्या सिमेंट घालण्याचे काम चालू आहे. त्यामुळे बर्‍याच वेळा या मार्गावर वाहतुकीची कोंडी होत असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच अटल सेतू ते गोवा वेल्हा या दरम्यानच्या रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवण्यात आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.