पणजी महानगरपालिका निवडणूक
सर्वसाधारण महिलांसाठी 10 प्रभाग राखीव
पणजी महानगरपालिकेच्या येत्या मार्च 2026 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग आरक्षण अधिसूचना काल जाहीर केली आहे. महानगरपालिकेचे
एकूण 10 प्रभाग महिलांसाठी राखीव असून त्यात सर्वसाधारण महिलांसाठी 6, ओबीसी महिलांसाठी 3, एसटी महिलांसाठी 1 प्रभाग, ओबीसीसाठी 5 प्रभाग राखून ठेवण्यात आले आहेत. तर, 15 प्रभाग सर्वसाधारण वर्गासाठी खुले आहेत.
नगरविकास खात्याच्या संचालकांनी प्रभाग फेररचना जाहीर केल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त मिनिनो डिसोझा यांनी प्रभाग आरक्षण जाहीर केले आहे.
नवीन प्रभाग आरक्षणानुसार महापौर रोहित मोन्सेरात यांचा प्रभाग 3 ओबीसी महिला, उपमहापौर संजीव नाईक यांचा प्रभाग 25 महिला, माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांचा प्रभाग 6 ओबीसी, माजी महापौर उदय मडकईकर यांचा प्रभाग 14 ओबीसी, ज्योईल आंद्रादे यांचा प्रभाग 8 ओबीसी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
प्रभाग 1 ः एसटी महिला, प्रभाग 2 ः ओबीसी महिला, प्रभाग 3 ः ओबीसी महिला, प्रभाग 4 ः सर्वसाधारण, प्रभाग 5 ः सर्वसाधारण, प्रभाग 6 ः ओबीसी, प्रभाग 7 ः सर्वसाधारण, प्रभाग ः 8 ओबीसी महिला, प्रभाग 9 ः सर्वसाधारण, प्रभाग 10 ः सर्वसाधारण, प्रभाग 11 ः सर्वसाधारण, प्रभाग 12 ः सर्वसाधारण, प्रभाग 13 ः सर्वसाधारण, प्रभाग 14 ः ओबीसी, प्रभाग 15 ः ओबीसी, प्रभाग 16 ः महिला, प्रभाग 17 ः सर्वसाधारण, प्रभाग 18 ः सर्वसाधारण, प्रभाग 19 ः महिला, प्रभाग 20 ः सर्वसाधारण, प्रभाग 21 ः ओबीसी, प्रभाग 22 ः महिला, प्रभाग 23 ः महिला, प्रभाग 24 ः सर्वसाधारण, प्रभाग 25 ः महिला, प्रभाग 26 ः सर्वसाधारण, प्रभाग 27 ः ओबीसी, प्रभाग 28 ः सर्वसाधारण, प्रभाग 29 ः महिला आणि प्रभाग ः 30 सर्वसाधारण अशी प्रभाग आरक्षण अधिसूचना जाही केली आहे.