प्रथमच महिला साहाय्यक रेफ्री

0
132

फिफा अंडर १७ विश्‍वचषक स्पर्धेला ६ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेमुळे भारतात उत्साहाचे वातावरण असतानाच या स्पर्धेद्वारे नवीन पायंडा घालण्याची तयारी फिफाने केली आहे. फिफाच्या पुरुषांसाठीच्या स्पर्धांसाठी साहाय्यक रेफ्री म्हणून आत्तापर्यंत केवळ पुरुषांनी काम पाहिले असून भारतातील या स्पर्धेद्वारे महिलांनासुद्धा यासाठी दारे खुली करण्यात आली आहेत. फिफाच्या रेफ्री पथकातील ‘एलिट’ दर्जाच्या महिला रेफ्रींना पुरुषांच्या स्पर्धेत उतरवण्याची हीच योग्य वेळ असल्याचे फुटबॉलचे संचालन करणारी सर्वोच्च संस्था असलेल्या फिफाने म्हटले आहे.
ओक री ह्यांग (कोरिया), ग्लेडिस लेंगवे (झांबिया), कॅरोल एनी चेनार्ड (कॅनडा), क्लाऊडिया अम्पीरेझ (उरुग्वे), ऍनी मेरी केली (न्यूझीलंड), कॅतरिना मोंझूल (युक्रेन) व इस्थर स्तॉबली (न्यूझीलंड) या महिला रेफ्री ७० पुरुष रेफ्रींसोबत जबाबदारी सांभाळतील. फिफाने नेमलेल्या ७७ रेफ्रींसोबत काम करून शिकण्याची संधी खिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या ८ रेफ्री व ८ साहाय्यक रेफ्रींन मिळणार आहे. फिफाने दिलेल्या या संधीमुळे आनंद झाला असल्याचे रेफ्री विभागाचे संचालक गौतम कर यांनी म्हटले आहे. यासारखी सुवर्णसंधी आत्तापर्यंत कधीच मिळाली नसल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.