प्रत्येक तालुक्यात पर्यावरणपूरक उद्योग उभारणार : मुख्यमंत्री

0
72

गोव्यातील प्रत्येक तालुक्यात उद्योग उभारून संबंधित तालुक्यातील नागरिकांना रोजगार उपलब्ध केला जाईल. त्यामुळे गोव्यातील युवकांना रोजगारासाठी एका टोकावरून दुसर्‍या टोकापर्यंत जाण्याची गरज भासणार नाही. प्रत्येक तालुक्यात गुंतवणूक प्रमोशन बोर्डतर्फे पर्यावरणपूरक उद्योग गोव्यात आणणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगे येथील नवीन पेप्सी प्रकल्पाचे उद्घाटनावेळी केले.

यावेळी व्यासपीठावर उद्योग मंत्री महादेव नाईक, आमदार सुभाष फळदेसाई, भाजपा प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, वरुण बेवरेजीचे चेअरमन विकांत जयपुरिया, वरुण जयपुरीया तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, गोव्यात गुंतवणूक प्रमेशन बोर्डाच्या अंतर्गत १३४ प्रकल्पांना प्राथमिक मान्यता दिली असून सर्व प्रकल्प पर्यावरणाचा समतोल राखणारे आहेत. त्यातील ४१ प्रकल्पांचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले आहेत. १६ प्रकल्पांचे उद्घाटन झाले असून यापुढे सुमारे २३००० ना रोजगार मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उद्योगमंत्री महादेव नाईक यांनी सांगेवासीयांसाठी हा ऐतिहासिक दिवस असल्याचे संगितले. सुभाष फळदेसाई यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे सदर प्रकल्प पूर्ण झाला असे ते म्हणाले. सुमारे ३८००० चौ. मी. क्षेत्रात सुमारे ६५ कोटी रुपये खर्च करून सदर प्रकल्प बांधण्यात आला आहे.