प्रतिज्ञापत्रात निवडणूक उमेदवार खोटी माहिती देतात

0
72

>>कायद्यात दुरुस्तीची ‘असोसिएशन ङ्गॉर डेमोक्रेटिक’ची मागणी

विधानसभा निवडणुकीच्यावेळी निवडणूक अधिकार्‍यांसमोर उमेदवारांकडून सादर करण्यात येणार्‍या प्रतिज्ञापत्रातील माहिती पूर्ण खरी नसते, असे दिसून आले आहे. त्यामुळे कायद्यात दुरुस्ती करून प्रतिज्ञापत्राचे पावित्र्य राखण्याची गरज आहे. यासंबंधी निवडणूक आयोगाला ‘असोसिएशन ङ्गॉर डेमोक्रेटिक रिङ्गॉर्मसने निवेदन सादर केले आहे, अशी माहिती संघटनेच्या गोवा शाखेचे प्रमुख भास्कर असोल्डेकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
आगामी विधानसभा निवडणूक ङ्गेब्रुवारी २०१७ मध्ये होण्याची शक्यता आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी चाळीस पैकी २९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरताना आपला व्यवसाय असल्याचे नमूद केले होते, अशी माहिती असोल्डेकर यांनी दिली.
निवडणुकीत सुशिक्षित उमेदवार उतरावेत, यासाठी संघटना जागृती करीत आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदान शनिवार किंवा रविवार या सुट्टीच्या दिवशी न घेता कामाच्या दिवशी घ्यावे, अशी मागणी आयोगाकडे केल्याचे त्यांनी सांगितले. सर्वसामान्य लोक शनिवार, रविवारी सहलीसाठी जातात. ते मतदान केंद्रावर येणे टाळतात, असे ते म्हणाले. आयोगालाही हा मुद्दा पटला आहे.
उमेदवारी अर्ज भरतेवेळी मालमत्तेची किंमत त्यावेळी असलेल्या बाजार किमतीनुसार असावी, अशीही सूचना आयोगाला केली आहे. संघटनेने राज्य निवडणूक आयोगाचे कार्यालय तसेच उपसभापती विष्णू वाघ, विधानसभेतील आमदारांची उपस्थिती व त्यांच्या कार्याची माहिती उपलब्ध व्हावी म्हणून निवेदन सादर केले आहे.