येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असलेल्या पणजी पोलीस स्थानकावरील हल्ला प्रकरणाची सुनावणी २२ डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली. या हल्ला प्रकरणात विद्यमान महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात हे मुख्य संशयित आरोपी आहेत. सध्या न्यायालयात पणजी पोलीस स्थानकाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांची जबानी नोंदवून घेण्याचे काम सुरू आहे. लोटलीकर वैद्यकीय कारणास्तव सुनावणीसाठी हजर न राहिल्याने काल ही सुनावणी २२ डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली.