राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या १२ वर

0
0

राज्यात मागील चोवीस तासात नवीन २७६ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली, त्यात नवीन केवळ १ कोरोनाबाधित आढळून आला. तसेच, चोवीस तासांत २ रुग्ण कोरोनामुक्त झाले. परिणामी राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या १२ एवढी खाली आली आहे. कोरोनाचा संसर्ग आता झपाट्याने कमी होत असून, नव्या रुग्णांमध्येही मोठी घट होताना दिसून येत आहे.