पणजी शहरातील पे पार्किंग योजना टप्प्या टप्प्याने करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी वरील योजनेची अंमलबजावणी करण्यापूर्वी महापौर व नगरसेवकांची बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. बैठक होईपर्यंत अंमलबजावणी पुढे ढकलण्याची विनंती महापालिकेला केल्याचे त्यांनी सांगितले.
सुरुवातीच्या काळात दोनच ठिकाणी पे पार्किंग केले जाईल. ते कसे यशस्वी होते ते पाहून हळूहळू अन्य ठिकाणी पे पार्किंग करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
इमारती कोसळणार याची आपल्याला माहिती मिळू शकत नाही, असे त्यांनी ‘क्लब नॅशनल’ इमारतीचा भाग कोसळण्या संबंधात विचारले असता सांगितले. सुरेंद्र फुर्तादो यांनी महापौरपदाचा ताबा घेतल्यानंतर शहरातील मोडगळीस आलेल्या दहा इमारतींची यादी आयुक्तांना सादर केली होती. त्यावर विचारले असता, महापौरांना आवश्यक ती कार्यवाही करण्यास सांगणार असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.