पेडणे तालुक्यात 8, 9 नोव्हेंबरला मर्यादित पाणी

0
94

पेडणे तालुक्यात येत्या 8 व 9 नोव्हेंबर 2023 रोजी मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्ती कामामुळे मर्यादित पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी पुरवठा विभागाने कळविले आहे.

येत्या 8 नोव्हेंबर 2023 रोजी नागझर पेडणे येथे मुख्य जलवाहिनी जोडणे व इतर दुरुस्ती कामे हाती घेण्यात येणार असल्याने 15 एमएलडी पाणी शुद्धीकरण प्रकल्प सकाळी 8 ते संध्याकाळी 4 यावेळेत बंद ठेवण्यात येणार आहे, असे कळविण्यात आले आहे.