>> १३ दिवसांत ११ व्यांदा वाढ
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काल रविवारीही वाढ झाली. काल हे दर ८० ते ८५ पैशांनी वाढले. आतापर्यंत १३ दिवसांत ११ वेळा इंधन दरवाढ झाली असून हे दर ८ रुपयांनी वाढले आहेत.
भारतीय तेल कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरानुसार दिल्लीत सध्या पेट्रोल १०३.४१ रुपये प्रति लिटर, तर डिझेल ९४.६७ रुपये प्रति लिटर झाले आहे. याचबरोबर मुंबईत ८४ पैशांची वाढ झाली असून त्यानुसार पेट्रोल ११८.४१ रुपये आणि डिझेल १०२.६४ रुपये प्रति लिटर झाले आहे. चेन्नईमध्ये इंधन दरात ७५ पैशांची वाढ होऊन, पेट्रोल १०८.९६ रुपये आणि डिझेल ९९.०४ रुपये लिटर आहे.
कोलाकातामध्ये पेट्रोल दरात ८४ पैशांची वाढ झाली असून पेट्रोल ११३.०३ रुपये लिटर पेट्रोल मिळत आहे आणि डिझेलचे दर ८० पैशांनी वाढले असून डिझेल ९७.८२ रुपये प्रति लिटर झाले आहे. पेट्रोलच्या किमतीवर अनेक घटकांचा परिणाम होतो. यात रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी यांचा समावेश आहे. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.