पुनर्विचार याचिका शिफारशीस मान्यता

0
149

मंत्रीमंडळ सल्लागार समितीने सर्वोच्च न्यायालयात खाण प्रश्‍नी पुनर्विचार याचिका दाखल करण्याची शिफारस मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्वीकारली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

मंत्रीमंडळ सल्लागार समितीच्या बुधवारी घेण्यात आलेल्या बैठकीत राज्यातील ज्वलंत खाण प्रश्‍नावर चर्चा केल्यानंतर खाण प्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची शिफारस केली होती. मुख्य सचिवांनी मंत्रिमंडळ सल्लागार समितीच्या बैठकीचा अहवाल अमेरिकेत उपचार घेणार्‍या मुख्यमंत्रांना पाठविला होता. खाण व्याप्त भागातील खनिजाचे वजन करणारे सर्व वजन काटे बंद करण्यात आले आहेत. राज्यातील खाणीवरून आणखीन खनिज मालाच्या वाहतुकीची शक्यता खाण खात्याने फेटाळून लावली आहे.