मोप विमानतळावर जीव्हीएमआर कंपनीसोबत फॉर्म्युला फोर कार रेसिंग आयोजनासंबंधी तीन वर्षांचा करार केला आहे. त्यामुळे आगामी तीन वर्षाचा उद्देश समोर ठेवून ट्रॅक तयार करण्यात आला आहे. त्यामुळे पुढच्या तीन वर्षात कार रेसिंग मोप विमानतळावरच होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. फॉर्म्युला फोर कार रेसिंग समारोपच्या सत्रात स्थानिक पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पुढे बोलताना पर्यटकांना वाव देण्यासाठी आयोजक अशा स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करतात त्यांना आमचा पाठिंबा राहील व आम्ही त्यांचे स्वागतही करतो असे सांगितले.