संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात काल पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील नागरिकांबद्दल महत्त्वाचे विधान केले आहे. पीओकेतील नागरिक हे भारतीय कुटुंबाचा भाग आहेत. ते एक दिवस नक्कीच स्वेच्छेने भारताच्या मुख्य प्रवाहात परत येतील, असे राजनाथ सिंह म्हणाले.