कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (पीएफ) आता कर्मचार्यांच्या भविष्य निर्वाह निधी ठेवीवरील व्याज दराचे प्रमाण चालू आर्थिक वर्षासाठी ८.७५ टक्के केले असल्याचे काल जाहीर करण्यात आले. संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या काल झालेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. केंद्रीय मजूरमंत्री नरेंद्र सिंग तोमर हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या निर्णयाचा पाच कोटीहून अधिक कर्मचार्यांना लाभ होणार आहे.