‘अंजुणेचे’ दरवाजे पुन्हा उघडले

0
211
पणजीतील पोलीस मुख्यालयात सुरक्षाविषयक उपाययोजनांसंदर्भात बोलावलेल्या कालच्या बैठकीत उपस्थित पोलीस अधिकारी.

२ दिवस मुसळधार
गेले सुमारे १० दिवस पावसाने दडी मारल्याने चिंतेत असलेल्या शेतकर्‍यांना पावसाने दोन दिवस जोरदार वृष्टी करून दिलासा दिला. मात्र पावसाचा जोर वाढल्याने अंजुणे धरणाच्या पातळीत ९२.४९ मीटर पर्यंत वाढ झाल्याने धरण अधिकार्‍यांनी पुन्हा चारही दरवाजे खुले करून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
धरण अभियंता ज्ञानेश्‍वर सालेलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पावसाचा जोर दोन दिवसात वाढल्याने सोमवारी पावसाची नोंद १४ मि. मि. झाली. धरणाची पातळी ९२.४९ झाल्याने पुन्हा चारही दरवाजे खुले करून पाणी सोडण्यात येत आहे. आतापर्यंत धरण परिसरात २९७९ मि. मि. पावसाची नोंद झाल्याची माहिती देण्यात आली.