गोवा पोलिसांच्या पिंक फोर्सने पाटो-पणजी येथील जुन्या पाटो पुलावरून नदीच्या पात्रात उडी घेऊन आत्महत्या करून पाहणाऱ्या एका महिला आणि तिच्या सात महिन्यांच्या मुलाला वाचविण्यात यश मिळविले.
ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. जुन्या पाटो पुलावर एक महिला मुलाला घेऊन संशयास्पद हालचाल करीत असल्याची माहिती मिळताच पिंक फोर्सच्या पथकाने तातडीने जुन्या पुलावर धाव घेऊन पुलावरून नदीच्या पाण्यात उडी घेण्याच्या तयारीत असलेल्या महिलेला मुलासह ताब्यात घेतले. पोलीस हवालदार सिंधवी नाईक आणि मेघा फडते यांनी त्वरित हालचाल करून दोघांचा जीव वाचविला.