पार्सेेकरांचा निर्णय आज शक्य

0
122

पेडणे (न. प्र.)
मांद्रेचे माजी कॉंग्रेस आमदार दयानंद सोपटे यांच्या भाजप प्रवेशामुळे दुखावलेले भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आज होणार्‍या भाजप बूथ कार्यकर्त्यांच्या बैठकीत आपली भूमिका जाहीर करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मांद्रे मतदारसंघ तसेच राज्यभरातील तमाम भाजप आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या या बैठकीकडे नजरा लागून आहेत. आजच्या बैठकीला माजी मुख्यमंत्री पार्सेकर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीत ते तसेच भाजप बूथ समिती कोणता निर्णय घेतात त्यानुसार पुढील भवितव्य ठरणार आहे.