पारोडा-केपेतील युवकाचा सुर्‍याने भोसकून खून

0
218

कोरीयाद-मुळस पारोडा येथे मिनीनो ऑलिव्हेरा या अडतीस वर्षिय युवकाचा मृतदेह त्याच्या घरा शेजारी धारदार सुर्‍याने भोसकून खून केल्याच्या स्थितीत काल आढळून आला.

सकाळी साडेआठच्या सुमारास ग्रामस्थांना सदर मृतदेह आढळून आल्यानंतर त्यांनी केपे पोलिसांना सदर घटनेची कल्पना दिली. केपे पोलीस त्वरित घटनास्थळी हजर झाले.

मयत ऑलिव्हेरा याच्या घरापासून साठ मीटर अंतरावर त्याचा मृतदेह पडून होता. मात्र त्याच्या पोटात खुपसलेला सुरा त्याच्या घरात पडला होता. घरांतील सामान विखुरलेले होते. तसेच तेथे रक्तही सांडलेले दिसत होते. या प्रकारामुळे घरात झटापट झाल्याचे स्पष्ट होत होते.

पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले. श्वानपथक घरापासून मृतदेह असलेल्या ठिकाणी व तेथून रस्त्यापर्यंत आले.