पाटील कुटुंबातील तिघांचेही मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन

0
10

मूळ कारवार आणि दाबोळी-वास्को येथील रहिवासी उद्योजक श्याम पाटील, पत्नी ज्योती पाटील आणि त्यांचा मुलगा दक्ष पाटील यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला होता. या तिघांच्याही मृतदेहाची शवचिकित्सा केल्यानंतर त्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

पोलीस तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, 28 जूनला श्याम पाटील यांनी पत्नी ज्योती पाटील व मुलगा दक्ष पाटील यांना कारवारमधील कालिंदी नदीत ढकलून दिले. त्यात त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यानंतर श्याम पाटील यांनी पाडी-केपे येथे गळफास घेत आत्महत्या केली. श्याम पाटील यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर कुंकळ्ळी पोलिसांनी नातेवाईकांकडे सोपवला. तसेच चित्ताकूल पोलिसांनी ज्योती पाटील व दक्ष यांचा मृतदेहही नातेवाईकांच्या ताब्यात दिला.