पाच पालिका निवडणुकीसाठी गुरूवारी २६ उमेदवारांचे अर्ज

0
68

>> आतापर्यंत एकूण ३६ जणांचे अर्ज

राज्यातील पाच नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आणखी २६ जणांनी उमेदवारी अर्ज काल दाखल केले. निवडणुकीसाठी आत्तापर्यंत एकूण ३६ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मडगाव, मुरगाव, म्हापसा, सांगे आणि केपे या पाच नगरपालिकांसाठी २३ एप्रिल २०२१ रोजी निवडणूक घेतली जाणार आहे. म्हापसा नगरपालिकेत काल २ उमेदवारी अर्ज, मडगाव ८ अर्ज, मुरगाव ७ अर्ज, केपे ९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. पंचायत पोटनिवडणुकीसाठी एकही अर्ज दाखल केलेला नाही.