पाचशे व हजाराच्या जुन्या नोटा खात्यात भरण्यावरील निर्बंध हटले

0
111

>> रिझर्व्ह बँकेचे दोन दिवसांत ‘यू टर्न’

 

रिझर्व्ह बँकेने आपल्याच परिपत्रकापासून दोन दिवसांत मोठा ‘यू टर्न’ घेत बँकांत जुन्या नोटांचा भरणा करण्यावरील निर्बंध हटविले. येत्या ३० डिसेंबरपर्यंत आता पाचशे व हजाराच्या जुन्या नोटांतील पैसे भरता येतील. मात्र, केवळ केवायसी दिलेल्या खात्यांमध्येच ते भरता येऊ शकतील.
जुन्या नोटा बदलण्यासंदर्भात रिझर्व्ह बँकेने सोमवारी लागू केलेल्या निर्बंधांवरून देशभरात टीकेची झोड उठल्यानंतर काल बँकेला आपले परिपत्रक मागे घ्यावे लागले.
नोटबंदीच्या गेल्या चाळीस दिवसांत रिझर्व्ह बँकेने साठवेळा परिपत्रके जारी केली आहेत. सोमवारी पाच हजार रुपयांपर्यंतचीच रक्कम जुन्या नोटांत बँकेत जमा करता येईल असा फतवा रिझर्व्ह बँकेने काढला होता. पाच हजारांवरील रकमेचा भरणा केवळ एकदाच करता येईल असेही सदर परिपत्रकात म्हटले होेते. मात्र, काल हे परिपत्रक मागे घेण्यात आले.