पाकिस्तानी दहशतवाद्यास राजधानी दिल्लीतून अटक

0
30

राजधानी दिल्लीतील लक्ष्मीनगरमधून एका पाकिस्तानी दहशतवाद्याला काल अटक करण्यात आली. हा दहशतवादी १० वर्षांहून अधिक काळ दिल्लीत लपून होता आणि तो सतत त्याच्या पाकिस्तानी म्होरक्यांच्या संपर्कात होता. अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव अशरफ ऊर्फ नूरी असून तो पाकिस्तानमध्ये बसलेल्या सूत्रधारांना माहिती पाठवत होता, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

पोलिसांनी अशरफला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अशरफकडून एके४७ रायफलसह अतिरिक्त मॅग्झिन, ६० जिवंत काडतुसे, एक हातबॉम्ब, २ अत्याधुनिक पिस्तुले व ५० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.