राष्ट्रीय तपास यंत्रणेने टाकले १८ विविध ठिकाणी छापे

0
31

जम्मू -काश्मीरमधील दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलण्यास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सुरूवात केली आहे. एनआयएने द रेझिस्टन्स फोर्स आणि पाकिस्तानी दहशतवादी संघटनांच्या भूमिगत कार्यकर्त्यांच्या १८ ठिकाणी छापे टाकले. हे भूमिगत कार्यकर्ते जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन, अल बद्र आणि इतर संघटनांशी संबंधित आहेत.

काश्मीर खोर्‍यात नागरिकांवर आणि इतरांवर अलीकडे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमागे या संघटनांचा हात असल्याचे म्हटले जाते आणि हे भूमिगत कार्यकर्ते त्यांना मदत करत आहेत. एनआयएने जम्मू -काश्मीरमधील वातावरण बिघडवल्याबद्दल १० ऑक्टोबर रोजी नवीन एफआयआर नोंदवला आहे. या अंतर्गत आता संस्थेने कारवाई सुरू केली आहे. एनआयएने मंगळवारी दिल्ली एनसीआर, उत्तर प्रदेश आणि जम्मू -काश्मीरमधील १८ ठिकाणी छापे टाकले. जम्मू -काश्मीरमध्ये, गलबुह काकापोरा येथील रहिवासी अब खलिक दारचा मुलगा ओवैस अहमद दार यांच्या घरावर छापा टाकला.