जम्मू जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सिमेवर शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन करताना पाकिस्तानी रेंजर्सनी शुक्रवारी अंधाधुंद गोळीबार चालूच ठेवला. काल या घटनेअगोदर पूंछ जिल्ह्यातील बेधूंद गोळीबारात भारताच्या हद्दीत असलेल्या गावातील महिला मृत्युमुखी पडली तर चार नागरिक जखमी झाले. सिमेवरील गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला असून लोकांनी घराबाहेर न पडण्याची ताकीद लष्कराने दिली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा तसेच आंतरराष्ट्रीय सिमेवर गेला महिनाभर शांतता होती.