दसरा उत्साहात साजरा

0
125

देशाच्या अन्य भागाबरोबरच गोव्यातही काल विजयादशमी दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राज्याच्या विविध भागात सोने लुटण्याचा कार्यक्रम असतो त्यामुळे शहरी भागात वास्तव्य करून असलेल्या लोकांनीही आपल्या मूळ गावी जाऊन या उत्सवास हजेरी लावली. वर्षपध्दतीप्रमाणे वेगवेगळ्या मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमही पार पडले. नवरात्रीची काल सांगता झाली. दसरा हा शुभमुहूर्त मानला जात असल्याने काल राज्यात अनेक नव्या आस्थापनांची उद्घाटने करण्यात आली. वाहनांच्या आस्थापनातही काल लोकांची गर्दी होती. संध्याकाळी सोने लुटून प्रत्येकाने एकमेकांना शुभेच्छा दिल्या.