पाकिस्तानची संसद अखेर बरखास्त

0
11

>> विरोधकांची सर्वोच्च न्यायालयात धाव

>> ९० दिवसांच्या आत निवडणूक

पाकिस्तानच्या राजकारणात काल रविवारी खळबळ उडाली. पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात विरोधक अविश्वास प्रस्ताव मांडण्याच्या तयारीत होते, पण नॅशनल असेंब्लीमध्ये इम्रान खान आले नाहीत. त्यामुळे उपसभापती कासिम सुरी यांनी पंतप्रधान इम्रान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव ङ्गेटाळला. त्यानंतर इम्रान खान यांनी दूरदर्शनच्या माध्यमातून देशाला संबोधित करत राष्ट्रपतींकडे संसद बरखास्त करून देशात पुन्हा निवडणुका घ्याव्यात, अशी शिङ्गारस केली. इम्रान खान यांच्या शिङ्गारशीनंतर अर्ध्या तासात राष्ट्रपती आरिङ्ग अल्वी यांनी संसद बरखास्त केली. त्यामुळे आता पुढील ९० दिवसांमध्ये पाकिस्तानमध्ये निवडणुका होणार आहेत, पाकिस्तानच्या संसदेत काल पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वासाचा प्रस्ताव उपसभापती कासिम सुरी यांनी हे एक परदेशी षडयंत्र असल्याचे म्हणत ङ्गेटाळला.

उपसभापतींनी हा अविश्वास प्रस्ताव संविधान आणि पाकिस्तानच्या नियमांविरुद्ध असल्याचे म्हटले आहे. अविश्वास प्रस्ताव ङ्गेटाळल्यानंतर संसदेचेे कामकाज २५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आले, तर, पंतप्रधान इम्रान खान यांनी संसद बरखास्त करण्याची शिङ्गारस राष्ट्रपतींकडे केली होती, ती मान्य करण्यात आली.

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू होताच इम्रान सरकारचे मंत्री चौधरी ङ्गवाद यांनी अविश्वास प्रस्तावावर सरकारची बाजू मांडली. उपसभापती कासिम सुरी यांनी अविश्वास प्रस्ताव हा घटनेच्या कलम-५ च्या विरोधात असल्याचे सांगत तो ङ्गेटाळला.

अविश्वास प्रस्ताव ङ्गेटाळला गेल्यानंतर देशाला संबोधित करताना इम्रान खान यांनी, हे एक षडयंत्र असून असे षडयंत्र जनता यशस्वी होऊ देणार नाही. सभापतींनी आपल्या अधिकारांचा वापर करून निर्णय दिला आहे. त्यानंतर मी आताच राष्ट्रपतींना सभागृह विसर्जित करण्याची सूचना पाठवली आहे. त्यामुळे आता देशात निवडणुका होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर केवळ अर्ध्या तासातच राष्ट्रपतींनी पाकिस्तानची संसद बरखास्त केली.

विरोधक सर्वोच्च न्यायालयात
उपसभापतींच्या या निर्णयाला विरोधकांनी कडाडून विरोध केला. बिलावल भुट्टो झरदारी यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर संविधानाचे उल्लंघन केल्याचा आरोप केला.

विरोधकांचा ताबा
राष्ट्रपतींनी संसद बरखास्त करत इम्रान यांची काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे. तर विरोधी खासदारांनी सदन सोडण्यास नकार देत त्यांनी आपला सभापती निवडला आणि संसदेचे कामकाज सुरू केले. तसेच विरोधकांनी खेळी करत अविश्वास प्रस्ताव ङ्गेटाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने खंडपीठही स्थापन केले आहे.

संसदेला कडेकोट सुरक्षा
संसद बरखास्त केल्याचा निर्णय राष्ट्रपतींनी जाहीर केल्यानंतर संसदेला अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. पाकिस्तान रेंजर्स आणि ङ्ग्रंटियर कॉर्प्ससह पोलीस आणि निमलष्करी दलांचे सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत.

पुन्हा निवडणूक

इम्रान खान यांचा कार्यकाळ आता संपुष्टात आल्यामुळे पाकिस्तानला पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. इम्रान खान यांना अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागले नसले तरी पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून त्यांची कारकिर्द संपुष्टात आली आहे.

नवाझ शरीफ यांच्यावर
लंडनमध्ये हल्ला

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीङ्ग यांच्यावर शनिवारी लंडनमध्ये हल्ला झाला. हा हल्ला पाकिस्तानातील सत्ताधारी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साङ्ग (पीटीआय) पक्षाच्या कार्यकर्त्याने केला असल्याची शक्यता आहे. या हल्ल्यात नवाझ शरीङ्ग यांचा सुरक्षारक्षक जखमी झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानमध्ये सध्या राजकीय अराजक सुरू आहे. या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर हा हल्ला झाला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

अर्ध्या तासात संसद बरखास्त

इम्रान खान यांच्या शिङ्गारशीनंतर राष्ट्रपती आरिङ्ग अल्वी यांनी अर्ध्या तासात पाकिस्तान संसद बरखास्त केली. त्यामुळे आता पुढील ९० दिवसांमध्ये पाकिस्तानमध्ये निवडणुका होणार आहेत, तोपर्यंत पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून इम्रान खान हे काम पाहणार आहेत.