पाककडून जवानाच्या मृतदेहाची विटंबना

0
85

>> जम्मू-काश्मीरमध्ये तीन जवान शहीद

 

जम्मू-काश्मीरमधील माछिल येथे पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले. मंगळवारी सकाळी ५ वाजता कुपवाडाच्या सब सेक्टर माछिलमध्ये पाकिस्तानकडून ङ्गायरिंग झाली. त्यानंतर हल्ला करण्यात आला. लेफ्टनंट विपिन रावत यांनी लष्कर प्रमुख जनरल दलबीरसिंह सुहाग यांना याबाबतची माहिती दिली.
दरम्यान, शहीदांतील एका जवानाच्या मृतदेहाची विटंबना पाक सैन्याकडून करण्यात आली असून यातून पाकची आपली हीन वृत्ती पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.
सडेतोड उत्तर देण्याचे आदेश
लष्कर प्रमुखांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना पाकिस्तानकडून हल्ला झाल्याचे आणि
मृतदेहाची विटंबना केली गेल्याचे कळवले. यावेळी पाकिस्तानच्या या हीन कृत्याबद्दल पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याचे आदेश संरक्षण मंत्रालयाकडून लष्कराला देण्यात आले आहेत.
महिन्याभरात पुन्हा एकदा…
दरम्यान, पाककडून याच वर्षी ऑक्टोबरमध्ये मनदीपसिंह या जवानाच्या मृतदेहाचा पाकिस्तानने असाच अपमान केला होता.
तसेच यापूर्वी २०१३ मध्ये लान्सनायक हेमराज आणि सुधाकर सिंह या जवानांच्या मृतदेहाची पाकिस्तानी सैनिकांनी विटंबना केली होती. त्या आधी १९९९ मध्ये कारगिल युद्धादरम्यान कॅप्टन सौरभ कालिया यांना पाकिस्तानी सैन्याने अतिशय यातना दिल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाची विटंबना केली गेली होती.
दहशतवाद्यांकडे दोन हजारांच्या नोटा
दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या बांदिपुरा येथे सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. परंतु या दहशतवाद्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन हजारांच्या नोटा सापडल्या. तसेच या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा व दारुगोळाही जप्त करण्यात आला आहे. मात्र या दहशतवाद्यांकडे या दोन हजारांच्या नोटा कशा आढळल्या याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले
आहे.