पश्‍चिम बंगालसह पाच राज्यांत विधानसभा निवडणूक

0
67

>> २७ मार्चपासून विविध टप्प्यांत मतदान, २ मे रोजी एकदम निकाल

येत्या काही दिवसांत तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम ही चार राज्ये तसेच पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार असल्याचे काल शुक३वारीनिवडणूक आयोगाने जाहीर केले. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी विधानसभा निवडणुकांसंंबंधी पत्रकार परिषदेत माहिती दिली. २७ मार्चपासून पश्‍चिम बंगालमध्ये निवडणुकीला प्रारंभ होणार असून २७ एप्रिलपर्यंत विविध टप्प्यांत पाचही राज्यांत या निवडणुका होतील. आणि पाचही राज्यांतील निवडणुकांचा निकाल २ मे रोजी एकाच दिवशी जाहीर केला जाईल.

पश्‍चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांसाठी आठ टप्प्यांत ही निवडणूक होणार असून पहिला टप्पा २७ मार्च रोजी तर आठवा टप्पा २७ एप्रिल रोजी होणार आहे. दुसरा टप्पा १ एप्रिल रोजी, तिसरा ६ एप्रिल, चौथा १० एप्रिल, पाचवा १७, सहावा २२, सातवा २७ एप्रिल रोजी तर आठवा टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी होईल.
पुडुचेरीत ३० मतदार संघांसाठी एकाच टप्प्यात म्हणजे ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
तामिळनाडूसाठी २३४ मतदारसंघ असून तिथेही एकाच टप्प्यात मतदान होणार असून ते ६ एप्रिल रोजी होईल.
केरळमध्येही एकाच टप्प्यात १४० मतदारसंघांसाठी ६ एप्रिल रोजी मतदान पार पडेल.

आसाममध्ये तीन टप्प्यात मतदान होणार आहे. आसामात १२६ मतदारसंघ असून पहिल्या टप्प्यात ४७ जागांसाठी २७ मार्च रोजी मतदान होईळ. दुसर्‍या टप्प्यात ४९ जागांसाठी १ एप्रिल रोजी मतदान होईल तर तिसर्‍या टप्प्यात ४० जागांवर ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी, निवडणुकीबाबत बोलताना विधानसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम या राज्यांतील उमेदवारांना जास्तीत जास्त ३८ लाख तर पुडुचेरीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त २२ लाख रुपये खर्च करण्यास परवानगी असल्याचे सांगितले. घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी केवळ पाच जणांना परवानगी दिली असल्याचे सांगितले. तामिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ २४ मे २०२१ रोजी, पश्चिम बंगालचा ३० मे २०२१ रोजी, केरळचा कार्यकाळ १ जून रोजी तर आसाम विधानसभेचा कार्यकाळ ३१ मे रोजी समाप्त होत आहे.