कोलकात्याच्या रस्त्यावर गुरुवारी भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षात पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कार्यालयाच्या दिशेने निघालेल्या भाजपच्या मोर्चाला पोलिसांनी बॅरिकेडस लावून अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर संघर्षाची ठिणगी उडाली.
राज्यातील ढासळत्या कायदा-सुव्यवस्थेचा निषेध नोंदवण्यासाठी गुरुवारी दुपारी कोलकाता, हावडा येथून हजारो भाजप कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे निघाले होते. पोलिसांनी हा मोर्चा वाटेत अडवला. त्यावेळी मोर्चेकरांनी बॅरिकेड्स हटवून पुढे जाण्याचा प्रयत्न करत केला. यावेळी संघर्ष सुरू झाला व पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार सुरू केला. तसेच अधूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. दरम्यान, पोलीस लाठीमार करत असतानाच आमच्यावर दुसर्या बाजूने दगडफेकही करण्यात येत होती असा आरोप भाजप नेते लॉकेट चटर्जी यांनी केला आहे. या प्रकरणात अनेक भाजप नेते जखमी झाले आहेत.