पश्चिम बंगालच्या राजकारणात भवानीपूर सध्या केंद्रस्थानी आहे. भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ३० सप्टेंबर रोजी मतदान होणार असून, पोटनिवडणुकीत प्रचाराचा काल शेवटचा दिवस होता. तृणमूल आणि भाजपाने ही जागा जिंकण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी येथून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरुद्ध भाजपने प्रियांका टिबरेवाल यांना उमेदवारी दिली आहे.
काल या प्रचारादरम्यान तृणमूल समर्थकांनी खासदार दिलीप घोष यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप भाजपने केला आहे. दिलीप घोष यांची भवानीपूरमध्ये पदयात्रा सुरू होती, त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या दरम्यान भाजप आणि तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी देखील झाली.