पर्रीकरांशी स्थानिक आप नेत्यांचे छुपे संबंध : कॉंग्रेस

0
99

आम आदम पार्टीचे स्थानिक नेते वाल्मिकी नाईक यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे भाजप व आम आदमी पार्टी यांच्यातील छुपे संबंध उघड्यावर आले आहेत, असे कॉंग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर हे वाल्मिकी नाईक यांच्या घरी त्यांच्या आजारी असलेल्या वडिलांची विचारपूस करण्यासाठी गेले होते असे नाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. पण यावेळी पत्रकारांनी त्यांना त्या संदर्भात आणखी काही प्रश्‍न विचारले असता त्या प्रश्‍नांचे उत्तर देणे त्यांनी का टाळले ते त्यांना स्पष्ट करावे लागेल, असे डिमेलो म्हणाले.